चाकोरी बाहेरचे लेखन होण्याची गरज – बाबा भांड

0
16

नवी दिल्ली : लेखकांनी चाकोरीबद्ध लेखन सोडून वेगवेगळ्या विषयांच्या मुळाशी जात लेखन करण्याचे आवाहन महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाचे अध्यक्ष, लेखक तथा प्रकाशक बाबा भांड यांनी केले.

श्री.भांड यांनी मंगळवारी महाराष्ट्र परिचय केंद्राला भेट दिली. यावेळी आयोजित अनौपचारिक गप्पांच्या कार्यक्रमात ते बोलत होते. ‘आपल्या अवती-भवती असे असंख्य विषय आहेत जे साहित्यापासून मैलो दूर आहेत. त्यांचा अभ्यास करून साहित्याच्या विविध प्रकारांमधून ते वाचकांपर्यंत पोहचले पाहिजे त्यासाठी लेखकाने आपल्या आवडीचा विषय निवडून यासंदर्भात काम करण्याची गरज असल्याचे’ त्यांनी यावेळी सांगितले.

परिचय केंद्राच्या माहिती अधिकारी अंजू निमसरकर-कांबळे यांनी श्री.भांड यांचे पुष्पगुच्छ व परिचय केंद्राची प्रकाशने भेट देऊन स्वागत केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपसंपादक रितेश भुयार यांनी केले. परिचय केंद्राचे अधिकारी -कर्मचारी, ग्रंथालयाच्या अभ्यासिकेचा लाभ घेणारे विद्यार्थी, वाचक व अभ्यासक यावेळी उपस्थित होते.