“व्यापमं’च्या मुख्य आरोपी शिवहारेस अटक

0
8

वृत्तसंस्था

नवी दिल्ली – व्यापमं गैरव्यहाराशी संबंधित असलेल्या रमेश शिवहारे या एका मुख्य आरोपीस केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) आज (बुधवार) कानपूरमधून अटक करण्यात यश मिळविले. 

उत्तर प्रदेश पोलिसदलाच्या विशेष पथकाबरोबर संयुक्तरित्या राबविण्यात आलेल्या या मोहिमेत गेल्या काही काळापासून फरार असलेल्या शिवहारेस जेरबंद करण्यात आले. उत्तर प्रदेशचे पोलिस महासंचालक जावीद अहमद यांनी यासंदर्भातील माहिती दिली. 

शिवहारे याने मध्य प्रदेश परीक्षा मंडळांतर्गत (व्यापमं) घेण्यात या परीक्षांना बसणाऱ्या बनावट उमेदवारांची सोय करण्यासंदर्भातील दलालाचे काम केले होते. या प्रकरणी विचारण्यात आलेल्या कोणत्याही प्रश्‍नास शिवहारे याने अद्याप उत्तर दिलेले नाही.