PMOची वेबसाइट मराठीसह सहा प्रादेशिक भाषांमध्ये

0
20
नवी दिल्ली, दि. २९ : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पंतप्रधानपदी निवड होण्याआधीच व राष्ट्रीय पातळीवर येण्याआधीच गुजरातचे विकास पुरूष म्हणुन सोशल मिडियात आपले वेगळे स्थान निर्माण केले होते.  मोदींनी सोशल मिडियाची ताकद , व्याप्ती व त्याचे भविष्य ओळखत भारतातील बहुतेक नेत्यांआधी त्यांनी सोशल मिडियाचा शितापिने वापर केला होता. आज पंतप्रधानांची इंग्रजीमध्ये असणारी वेबसाईट सहा प्रादेशिक भाषेमध्ये सुरु करण्यात आली आहे. त्याद्वारे जनतेशी तसेच मतरांनी अधिकाधिक जवळीक वाढेल. नवी दिल्ली येथे परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी या सहाही वेबसाइट लाँच केल्या. यामध्ये बंगाली, गुजराती, मल्याळम, तमिळ, तेलुगू आणि मराठीचा समावेश आहे.