संघाच्या नजरेत सम्राट अशोकही खलनायक

0
12

जयपूर (राजस्थान) – राजस्थानमधून इतिहासाच्या मोडतोडीच्या बातम्या नेहमीच येत असतात. यावेळी तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) मुखपत्र ‘बप्पा रावल’ मधून सम्राट अशोकाला भारतीय इतिहासाचा खलनायक म्हटले आहे. एवढेच नाही तर बौद्ध धर्माबद्दलही त्यात आक्षेपार्ह्य लिखान करण्यात आले आहे.

काय आहे प्रकरण
> आरएसएसची सिस्टर ऑर्गनायझेशन ‘राजस्थान वनवासी कल्याण परिषदे’चे मुखपत्र ‘बप्पा रावल’च्या मे 2016 च्या अंकामध्ये ‘भारत : कल, आज और कल’ लेखमालेत सम्राट अशोकांबद्दल आक्षेपार्ह्य लिखान करण्यात आले आहे.
> मुखपत्राच्या संपादिका डॉ. राधिका लढा यांनी हा लेख लिहिला आहे.
> यामध्ये सम्राट अशोकांच्या महानतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करुन म्हटले आहे, की मौर्य साम्राज्याचे सम्राट अशोक यांच्यामुळे भारतावर संकट कोसळले. युनानी हल्लेखोर भारत पादाक्रांत करण्यास आले.
> यात म्हटले आहे, की सम्राट अशोक भारताच्या अवनतीचे कारण बनले आणि आम्ही त्यांनाच महान सम्राट म्हणतो, हे आमचे दुर्दैव आहे.
> या लेखात एका ठिकाणी म्हटले आहे, ‘सम्राट अशोकांनी जसा बौद्ध धम्म स्विकारला तसेच ते भिक्षू होऊन बौद्ध धम्म प्रचारक झाले असते तर बरे झाले असते.’
> ‘त्या उलट त्यांनी संपूर्ण साम्राज्य बौद्ध धम्माचे प्रचार केंद्र करुन विशाल मठात रुपांतरीत केले.’

संपादकांचा दावा – हे सर्व सत्य
> या संबंधी दैनिक भास्करने मुखपत्र प्रकाशित करणाऱ्या संघटनेचे राज्य मंत्री राजाराम यांच्याकडे विचारणा केली तेव्हा त्यांनी यात काहीही खोटे नसल्याचा दावा केला.
> राजाराम म्हणाले, ‘मुखपत्राच्या संपादिका डॉ. राधिका लढा यांनी जे लिहिले आहे ते खरे आहे.’

कनिष्कला ठरविले विदेशी
> मुखपत्रातील पान क्रमांक 11 वर बौद्ध धम्माबद्दल उलट-सुलट माहिती देण्यात आली आहे. तर पान क्रमांक 12 वर बौद्ध धम्म स्विकारणारे राजा कनिष्क हे भारतीय नसून विदेशी असल्याचा खोडसाळपणा संपादिकेने केला आहे.
> सर्वांना माहित आहे, की महान चक्रवर्ती सम्राट अशोक आणि कनिष्क यांची गणना महान शासकांमध्ये केली जाते.
> भारतीय इतिहासात नमूद आहे आणि इतिहासकारांचेही एकमत आहे की हिंसा आणि युद्धाच्या प्रसंगात या दोन्ही राजांनी अवघ्या तीन दिवसांमध्ये शांतता प्रस्थापित केली होती.
> जगभरातील इतिहासकार यांना मानवतावादी आणि शांतता प्रिय लोकशाही राज्यांची स्थापना करणारे राजे मानतात.
> सम्राट अशोकांच्या काळात देशामध्ये अनेक नव्या गोष्टींना चालना मिळाली आणि त्यांना प्रोत्साहनही देण्यात आले.
इतिहासकारांनी केली टीका
> इतिहासकार के.एस.गुप्ता यांनी या संपूर्ण प्रकरणात लेखिकेचे आकलन चूकीचे असल्याचे म्हटले आहे.
> ते म्हणाले, ‘एका चूक किंवा दोषावरुन कोणाचेही संपूर्ण व्यक्तीमत्व जोखता येत नाही. तेव्हाची परिस्थिती काय होते हे इतिहास सांगताना सर्वात महत्त्वाचे असते. आणि ती परिस्थिती वेगळी होती.’
> गुप्ता म्हणाले, ‘अशोकानंतर सातव्या आणि आठव्या शतकातही विदेशी आक्रमण झाले होते. तेव्हा तर अहिंसेचे धोरण कोणी राबवत नव्हते. तेव्हा कोणाला दोष देणार ?’

लेखिका काय म्हणाल्या ?
> ‘बप्पा रावल’च्या संपादक डॉ. राधिका लढा म्हणाल्या, ‘सम्राट अशोकांनी बौद्ध धम्म स्विकारला आणि या धर्माला राजाश्रय मिळूवन दिला. राजधर्म केले. एवढेच नाही तर विदेशातून कोणी आले आणि ते जर बौद्ध असतील तर अशोक तत्काळ त्यांच्यावर विश्वास ठेवत होते. हे चूकीचे होते.'( जयपूर दिव्य मराठी)