आरबीआयच्या गव्हर्नरपदासाठी चार नावांची चर्चा

0
8

नवी दिल्ली, दि. २६ – रघुराम राजन यांच्या जागी आरबीआयच्या गव्हर्नरपदासाठी केंद्र सरकार सध्या चार नावांवर विचार करत असल्याची माहिती वरिष्ठ सरकारी अधिका-याने रॉयटर्स या वृत्तसंस्थेला दिली आहे. चार नावांपैकी तिघांनी रिझर्व्ह बँकेमध्ये काम केले असून, एका देशातील सर्वात मोठया व्यावसायिका बँकेची प्रमुख आहे.

आरबीआयचे उपगव्हर्नर उर्जित पटेल, माजी उपगव्हर्नर राकेश मोहन, सुबीर गोकर्ण आणि स्टेट बँक ऑफ इंडियाच्या चेअरमन अरुंधती भट्टाचार्य या चार नावांवर चर्चा सुरु आहे. नवीन मॉनिटरी पॉलिसी कमिटी ही लवकरच निवडली जाईल.