राजर्षी शाहू महाराज जयंती उत्साहात

0
8

भंडारा,दि.27- येथील ओबीसी सेवा संघ भंडाराच्यावतीने राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त व सामाजिक न्याय दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाला संघाचे जिल्हा अध्यक्ष व प्रदेश उपाध्यक्ष तसेच जिल्हा कार्यकारिणीचे पदाधिकारी उपस्थित होते.यावेळी पाहुण्यांनी छत्रपती शाहु महाराजांचे विचार आणि आरक्षणाची भूमिका समाजापर्यंत पोचविणे गरजेचे झाले आहे.त्यांच्या विचाराना तेवत ठेवण्यासाठी सर्वांनी समाजकार्यातून माहिती द्यावे असे विचार व्यक्त केले.यावेळी प्रा.डाॅ.सातोकर मॅडम, भैय्याजी लांबट, गोपाल सेलोकर, गोपाल देशमुख आदींनी मार्गदर्शन केले.