अरुणाचलच्‍या शहीद हवलदाराला अशोक चक्र

0
18

वृत्तसंस्था
नवी दिल्‍ली,दि.14- देश स्‍वातंत्र्याच्‍या 70 व्‍या वर्धापन दिवसाच्‍या पूर्वी दिवशी (रविवार) राष्‍ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी शौर्य पुरस्‍कारांची यादी जाहीर असून, शहीद हांगपान दादा यांच्‍या शौर्याचा अशोक चक्राने सन्‍मान केला जाणार आहे. यंदा देशातील एकूण 82 वी जवानांचा शौर्य पुरस्‍कारांनी गौरव करण्‍यात येणार आहे. यात 14 शौर्यचक्रांचा समावेश आहे. शिवाय 63 सेना, 2 वायुसेना आणि 2 नौसेना पुरस्कार जाहीरही झाले आहेत.
14 जवानांना शौर्य चक्र…
पठाणकोट हल्‍ल्‍यातील शहीद लेफ्टिनेंट कर्नल ई. के. नीरंजन, पम्पोर अटॅकमध्‍ये शहीद झालेले कॅप्टन पवन कुमार आणि हॅप्टन तुषार महाजन यांच्‍यासह 14 जवानांना शौर्य चक्र दिले जाणार आहे.
याच वर्षी 28 मे रोजी दहशतवाद्यांच्‍या एका पथकाने नौगाम सेक्‍टरमध्‍ये घुसखोरी केली होती.एलओसीचा हा परिसर समुद्र तळापासून 13 हजार फूट उंचावर आहे. येथे कामय बर्फ असतो.
आपल्‍या आर्मीच्‍या जवानांना दहशतवाद्याच्‍या हालचालीबद्दल माहिती मिळाली.सैन्‍याच्‍या एका तुकडीने हांगपान दादाच्‍या नेतृत्‍वात त्‍यांना घेरले.एन्‍काउंटर सुरू झाले तर दहशतवाद्यांनी दाट झाडांत लपून बेछुट गोळीबार सुरू केला.त्‍यांना उत्‍तर देणे अवघड होते.परंतु, हवलदार हांगपान दादांनी जीवाची पर्वा न करता मोठ्या शौर्याने त्‍यांच्‍यावर हल्‍ला चढवला.त्‍यांनी पुढे जात तिघांना कंठस्‍नान घातले. पण, चौथ्‍याला मारताना त्‍यांना गोळ्या लागल्‍या.दादा नावाने होते प्रसिद्ध होते हांगपान 36 वर्षीय शहीद हांगपान हे अरुणाचलच्‍या बदौरिया गावातील रहिवासी होती. त्‍यांचे सहकारी त्‍यांना दादा म्‍हणूनच हाक मारत. त्‍यांच्‍या पश्‍यात पत्नी चासेन लवांग, 10 वर्षांची मुलगी रौखिन आणि 6 वर्षांचा मुलगा सेनवांग आहे.