वाहून गेलेल्या ‘तवेरा’ कारचे अवशेष व दोन मृतदेह आढळले

0
10

विशेष प्रतिनिधी
मुबई,दि.14- महाड तालुक्यातील सावित्री नदीवरील पूल कोसळल्याच्या घटनेला रविवारी १२ दिवस पूर्ण झाले. वाहून गेलेल्यांचा शोध घेणाऱ्या भारतीय नौदलाच्या जवानांना कोसळलेल्या पूलापासून ३00 मिटर अंतरावर, एमएच 0४ जीडी ७८३७ या क्रमांकाच्या ‘तवेरा’ कारचे अवशेष सापडले. ४ ते ५ मिटर पाण्याखाली सापडलेल्या या कारच्या अवशेषांबरोबरच दोन मृतदेह सापडल्याची माहिती राष्ट्रीय आपत्ती नियंत्रण प्राधिकरणाचे प्रमुख निवासी उपजिल्हाधिकारी सतिष बागल यांनी दिली. शोध पथकाला शनिवारी दुपारी दुसरी बस सापडली होती.