भारतातील आपत्ती व्यवस्थापन दुबळे

0
10

पायाभूत सुविधांचा अभाव- जागतिक स्तरावरील सर्व्हेक्षणातील निकष

नागपूर-नैसर्गिक संकटांच्या काळात मूलभूत सुविधांचे गांभीर्य आणि कमकुवत वाहतूक व्यवस्थेमुळे आपत्तीचे धोके अधिकच वाढत आहेत. ते टाळण्यासाठी आपत्ती व्यवस्थापनाचा दर्जा उंचावणे गरजेचे आहे. मात्र, इतर देशांच्या तुलनेत भारताचे आपत्ती व्यवस्थापन दुबळे असल्याचे जागतिक पातळीवरील एका सर्वेक्षणात पुढे आले आहे. भविष्यात त्यात सुधारणा न झाल्यास नैसर्गिक संकटांसह इतरही संकटांना भारताला सामोरे जावे लागेल, असा धोक्याचा इशारा आपत्ती व्यवस्थापनाच्या जागतिक अहवालात देण्यात आला आहे.
‘युनायटेड नेशन्स युनिव्हर्सिटी इन्स्टिटय़ुट फॉर एन्व्हायर्नमेंट अँड ह्य़ुमन सिक्युरिटी’ आणि ‘बन्डनीस एन्ट्विक्लंग हिफ्ट इन कार्पोरेशन’ (युएनयू-इएचएस) ने जर्मनीतील स्टुटगार्ट विद्यापीठाच्या सहकार्याने जागतिक धोका निर्देशांक अहवाल-२०१६ गुरुवार, २५ ऑगस्टला प्रकाशित केला. जगातील १७१ देशांमध्ये नैसर्गिक अडथळे आणि सामाजिक असुरक्षिततेच्या एकत्रित विश्लेषणाच्या माध्यमातून आपत्तीच्या जोखमीचे मूल्यमापन करण्यात आले. यात भारत ७७ व्या, तर पाकिस्तान ७२ व्या क्रमांकावर आहे. आपत्तीची जोखीम अधिक असणाऱ्या देशांमध्ये बांगलादेशाचा क्रमांक पहिल्या पाचमध्ये आहे.