गुजरातचा राडाः मोदींनीआनंदीबेन पटेलांना दिल्लीत बोलाविले

0
11

नवीदिल्ली- भाजप अध्यक्ष अमित शहा यांची गुरूवारी सुरतमध्ये आयोजित सभा उधळल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातच्या मुख्यमंत्रीपदावरून नुकत्याच पायउतार झालेल्या आनंदीबेन पटेल यांना तातडीने दिल्लीत बोलावून घेतले.  या आदेशानंतर आनंदीबेन पटेल खासगी विमानाने दिल्लीला रवाना झाल्याची माहिती भाजपमधील सूत्रांकडून  बाहेर आली आहे.

आनंदीबेन पटेल यांना महिन्याभरापूर्वीच गुजरातच्या मुख्यमंत्रीपदावरून पायउतार व्हावे लागले होते. आपला उत्तराधिकारी म्हणून नितीन पटेल यांना डावलल्याने आनंदीबेन नाराज झाल्या होत्या. अमित शहा यांनी नितीन पटेल यांना डावलत स्वत:च्या मर्जीतील विजय रुपानी यांना मुख्यमंत्री बनवले होते. मुख्यमंत्री निवडीसाठी झालेल्या नेतेमंडळींच्या बैठकीतही अमितभाई व आनंदीबेन यांच्यात शाब्दिक चकमकी उडाल्या होत्या. त्यामुळे अमित शहा आणि आनंदीबेन पटेल यांच्यातील वाद विकोपाला गेला होता.  या पार्श्वभूमीवर काल सुरतमध्ये अमित शहांची उधळण्यात आल्यामुळे राजकीय चर्चेला ऊत आला आहे.