अखिलेश-शिवपाल समर्थक भिडले

0
8
लखनऊ, दि. २४ – उत्तरप्रदेश विधानसभा निवडणूक काही महिन्यांवर आलेली असताना राज्यातील सत्ताधारी समाजवादी पक्षामध्ये मोठया प्रमाणावर ‘यादवी’ सुरु आहे. गृहकलह अधिक तीव्र झाला असून, आज लखनऊमध्ये समाजवादी पक्षाच्या मुख्यालयात होत असलेल्या बैठकीआधी या यादवीची झलक दिसून आली.
सपा मुख्यालयाबाहेर जमलेले मुख्यमंत्री अखिलेश यादव आणि समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शिवपाल यादव यांचे समर्थक परस्परांना भिडले.  पक्षांतर्गत ज्या घडामोडी सुरु आहेत त्या पार्श्वभूमीवर सपाचे सर्वोच्च नेते मुलायमसिंह यादव मोठा निर्णय घेतील अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
समाजवादी पक्षातील फूट टाळण्यासाठी मुलायमसिंह अखिलेश यांना मुख्यमंत्रिपदावरुन हटवून स्वत: मुख्यमंत्रिपद हाती घेतील शक्यता आहे. समाजवादी पक्षाचे अध्यक्ष मुलायम सिंह यादव यांनी  खासदार, आमदार, विधान परिषदेचे आमदार आणि वरिष्ठ नेत्यांची बैठक बोलावली असून मंत्रीमंडळातून निलंबित झालेले शिवपाल यादव यांनाही बैठकीसाठी बोलावण्यात आले आहे.