पाच राज्यांतील निवडणुका आज होणार जाहीर

0
5

नवी दिल्ली, दि. 4 – निवडणूक आयोग आज उत्तर प्रदेश, गोवा, उत्तराखंड, मणिपूर आणि पंजाब या पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुका जाहीर करणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, फेब्रुवारी ते मार्च महिन्यादरम्यान या राज्यांतील निवडणुकांच्या तारखा जाहीर होण्याची शक्यता आहे. दुपारी 12 वाजता निवडणूक आयोगाकडून पत्रकार परिषद घेऊन निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात येईल.

उत्तर प्रदेशात 7 टप्प्यांमध्ये विधानसभा निवडणूक होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तर अन्य राज्यांमध्ये एका टप्प्यातच विधानसभा निवडणूक प्रक्रिया पार पडेल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. समाजवादी पक्षाचे उत्तर प्रदेशात पुन्हा सत्ता मिळवण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत. मात्र, पक्षातील ‘वर्चस्व’ वादाचा परिणाम निवडणुकीतील लढाईवर होण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे. तर दुसरीकडे उत्तर प्रदेशात सत्ता काबिज करण्यासाठी भाजपादेखील या सपाच्या अंतर्गत वादाचा पुरेपुर फायदा उठवण्याचा प्रयत्न करत आहे.