६८ वा प्रजासत्ताक दिन : राजपथावर पार पडला दिमाखदार सोहळा

0
16

नवी दिल्ली,दि.26- 68व्या प्रजासत्ताक दिनी राजपथावर अनेक गोष्टी प्रथमच पाहाण्याची संधी देशवासियांना मिळाली. UAE आर्मीने प्रथमच भारतात पथसंचलन केले. अबू धाबीचे प्रिन्स शेख मोहम्मद बिन जायद अल नाह्यान प्रजासत्ताक दिनाचे मुख्य अतिथी होते.त्यांच्यासह राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच उपराष्ट्रपती हमीद अन्सारी, संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांच्यासह दिग्गज नेतेमंडळीही हजर आहेत. हंगपन दादा यांना मरणोत्तर अशोक चक्रने सन्मानित करण्यात आले. भारतीय बनावटीचे लाइट कॉम्बॅट एअरक्राफ्ट तेजसने राजपथावर फ्लाय पास्ट केले. स्वदेशी बोफोर्स म्हटली जाणारी धनूष तोफही आज प्रथमच सर्वांच्या नजरेस पडली. भारत देश हा विविधतेत एकता असणारा देश असल्याचे विविध चित्ररथांनी पुन्हा एकदा दाखवून दिले.
भारताच्या ६८ व्या प्रजासत्ताक दिनाचा सोहळा देशभरात उत्साहाने साजरा होत असून राजधानी दिल्लीतही राजपथावर भारतीय सैन्याच्या संचलन केले.
अबुधाबीचे राजपुत्र यंदाच्या प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे असल्याने संयुक्त अरब अमिरातीचे १४९ सैनिक यंदा राजपथावर संचलन केले. यासोबतच नॅशनल सिक्युरिटी गार्ड्सचे (ब्लॅक कॅट्स) राजपथावरील संचलनाचे वैशिष्ट्य होते.. नॅशनल सिक्युरिटी गार्ड्स पहिल्यांदाच राजपथावरील संचलनात सहभाग घेतला.
फायटर प्लेन तेजसचे फ्लाय पास्ट
– राजपथावर तेजस फ्लाय पास्ट करताना दिसले. प्रजासत्ताक दिनी हवाई कवायत दाखवण्याची तेजसची ही पहिली वेळ होती. तेजसने फ्लाय पास्ट केले.
– याआधी ही संधी स्वदेशी बनावटीच्या मारुतीला मिळत होती. 1971 च्या युद्धात महत्त्वाची भूमिका बजावणारे मारुतीला 1990 मध्ये निवृत्त करण्यात आले होते.
– तेजस भारतीय हवाई दलात सहभागी झाले आहे. 250 ते 300 किलोमीटरपर्यंत या विमानाची रेंज आहे. अवघ्या 460 मीटर रनवेवरुन टेकऑफ करु शकते.
– तेजस हवेतून हवेत आणि हवेतून जमीनीवर मारा करण्यात सक्षम आहे. 50 हजार फूट उड्डाण भरण्याएवढे तेजसमध्ये बळ आहे.
चित्ररथ
– भारतात सांस्कृतिक विविधता आहे. असे असूनही भारतात विविधतेत एकता दिसून येते.
– अरुणाचल प्रदेशाच्या चित्ररथात बौद्ध धर्माच्या महायान पंथाचे प्रसिद्ध याक नृत्य सादर केले.
– महाराष्ट्राचा चित्ररथ राजपथावर आल्यानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उठून उभे राहिले.
– या चित्ररथासोबत लावणी, कुस्ती आमि मल्लखांबाचे सादरीकरण करण्यात आले.
– यंदाचा चित्ररथ लोकमान्य टिळक यांच्या स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे ! या घोषणेला समर्पीत आहे.
– गुजरातच्या चित्ररथात कच्छ कला आणि लोकजीवनाचा समावेश होता. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रमुख अतिथी अबू धाबीच्या प्रिन्सला त्याची माहिती दिली.
– लक्षद्वीप चित्ररथाने 36 द्विपांच्या समुहाचा नजार राजपथावर सादर केला.
– कर्नाटकाच्या चित्ररथाच्या माध्यमातून दक्षिणेच्या पारंपारिक कलाप्रकाराचे दर्शन घडले.
– दिल्लीच्या चित्ररथाला तीन वर्षानंतर सहभागी होण्याची संधी मिळाली.
– यात आदर्श सरकारी शाळांचे दर्शन घडविण्यात आले. त्यासोबतच गीत हे अन्यायाविरोधात आवाज उठविण्याचा संदेश देणारे होते.

हिमाचल प्रदेशाच्या चित्ररथाने पहाडी संस्कृतीचे दर्शन घडविले.
– हरियाणाच्या चित्ररथातून बेटी बचाओ-बेटी पढाओचा संदेश दिला गेला. महिलांच्या सशक्तीकरणावर त्यांचा फोकस होता.
– त्यासोबतच हरियाणाच्या पारंपरिक खेळ आणि संस्कृतीचे दर्शन होते.
– पश्चिम बंगालच्या चित्ररथासोबत शरद उत्सवाच्या विशाल आयोजनाची झलक पाहायला मिळाली.
– पंजाबचा परंपारिक लोकनृत्य जागो नृत्याने राजपथावरील वातावरण जोशपूर्ण झाले. पंजाबचे सौंदर्य यावेळी जनसमुहाने पाहिले.
– तामिळनाडूच्या चित्ररथासोबत लोकप्रिय करगाट्म नृत्य सादर करण्यात आले.
– हलक्या पावसाच्या सरींमुळे देशभरातून राजपथावरील पथसंचलन पाहाण्यासाठी आलेल्यांना सांस्कृतिक देखाव्यासोबत पावसाने चिंब केले.
– गोवा येथील चित्ररथाने गोवन संगीताचा आनंद सर्वांना दिला.
– त्रिपूराच्या होजगिरी या राज्याच्या लोकनृत्याची झलक दाखविली. त्यासोबत त्रिपूरा महिलांचे पारंपरिक लोकनृत्य होते.
– काश्मीरच्या चित्ररथाने गुलमर्गचा नजारा राजपथावर आणला होता. गुलमर्ग हे जगातील पर्यटकांना आकर्षित करणारे ठिकाण आहे. येथे बर्फवृष्टीनंतरचे खेळ प्रसिद्ध आहे.
– आसामने कामख्या मंदिराचा देखावा देशवासियांसाठी आणला होता.
– यानंतर विविध मंत्रालयाचे चित्ररथ आले. आपापाल्या मंत्रालयाचे कार्य दाखवण्याची ही चांगली संधी असते.
– सुक्ष्म आणि लघु उद्योगाने खादीवर भर देणारा देखावा सादर केला. स्वावलंगनाची शिकवण त्यांनी दिली.
– सीएसआयआरने विज्ञानाच्या प्रगतीची झलक दाखविली. पंतप्रधान मेक इन इंडियाबद्दल नेहमी जोर देऊन बोलत असतात.
– केंद्रीय लोक निर्माण विभागाचा चित्ररथ सर्वांना आकर्षित करणारा ठरला.
– कौशल्य विकास आणि उद्योग मंत्रालायाचा चित्ररथ जगात देशाचे नाव करण्याची हाक देत कौशल्य विकासावर भर देत होता.
– बालशौर्य पुरस्कार विजेते 25 मुले संचलनात सहभागी झाले. यातील 4 मुलांना मरणोत्तर शौर्य पुरस्कार देण्यात आला. यंदा ही मुले उघड्या जीपमधून राजपथावर आली. पूर्वी हत्तीवरुन त्यांना आणले जात होते.
UAE आर्मी पथसंचलनात
– यूएई आर्मी भारतात प्रथमच पथसंचलन करणार आहे. गेल्यावर्षी फ्रान्सचा जवानांनी राजपथावर पथसंचलन केले होते.
– यूएईचे 144 जवान आणि 44 बँड मेंबर पथसंचलनात सहभागी होणार आहे.
एनएसजी कमांडो
– नॅशनल सेक्यूरिटी गार्ड (एनएसजी) प्रथमच पथसंचलन करणार आहे. आजपर्यंत त्यांनी प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी संरक्षणाचे काम केले.
– गृहमंत्रालयांतर्गत येणारे एनएसजी कमांडोजचे मुख्य कार्य काऊंटर टेररिजम संपवणे आहे . VVIPs च्या सुरक्षेत एनएसजी जवान तैनात असतात.
AEWS & CS
– पथसंचलनात प्रथमच एअरबोर्न अर्ली वॉर्निंग कंट्रोल सिस्टिमचे प्रदर्शन होणार आहे.
– या तंत्रज्ञानामुळे शत्रुची माहिती लवकर दिली जाते.
– AEWS & CS तंत्रज्ञान जगातील फक्त 5 देशांकडे आहे.
देशी बोफोर्स धनुष
– देशी बोफोर्स म्हणून ज्या तोफेने नावलौकिक मिळविला आहे त्या धनुषचे आज प्रथमच देशाला दर्शन होणार आहे.
– जबलपूर गन कॅरिज फॅक्ट्रीमध्ये तयार झालेल्या धनुषची किंमत 14 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे.
– या तोफेला देशी बोफोर्स म्हटले जात असले तरी वास्तविक बोफोर्स पेक्षा धनुषची ताकद अधिक आहे.
– बोफोर्सपेक्षा धनूष लांब पल्ल्याचा मारा (38 किलोमीटर) करु शकते.
कॅशलेस व्यवहारावर चित्ररथ
– माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयाच्या माहितीनुसार, नोटबंदीनंतर कॅशलेस व्यवहाराला प्रोत्साहन देण्यात आले. त्याचे फायदे सांगण्यासाठी चित्ररथ तयार करण्यात आला आहे.
– पंतप्रधानांनी लाँच केलेले भीम अॅप, यूपीआय यांच्या माध्यमातून कॅशलेस व्यवहाराची माहिती दिली जाण्याची शक्यता आहे.
– भीम अॅप लाँच करताना मोदींनी भारतीय घटनेचे शिल्पकार आणि अर्थतज्ज्ञ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना हे अभिवादन असल्याचे सांगितल होते.