केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्यात वाढ

0
7

नवी दिल्ली, दि. 15 – देशातील केंद्रीय कर्मचा-यांसाठी एक खुशखबर आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने केंद्रीय कर्मचा-यांच्या महागाई भत्यात दोन टक्क्यांची वाढ केली आहे.
केंद्रीय कॅबिनेट मंत्रिमंडळाची बुधवारी संध्याकाळी बैठक झाली. या बैठकीत केंद्रीय कर्मचा-यांच्या महागाई भत्यात दोन टक्क्यांनी वाढ करण्याच्या निर्णयाला मंजुरी देण्यात आली. या निर्णयामुळे देशातील 55 लाख 51 हजार निवृत्तीधारकांना तर 48 लाख 85 हजार कर्मचा-यांना याचा लाभ मिळणार आहे. सर्व कर्मचा-यांच्या महागाई भत्यात ही वाढ एक जानेवारीपासून लागू करण्यात येणार आहे.
याचबरोबर कॅबिनेट मंत्रिमंडळाने आयआयटी संशोधन विधेयक, सातव्या वेतन आयोगाची शिफारस आणि भारत – बांगलादेश सीमेवरील सुरक्षेसंदर्भातील सुधारीत मसूदा मंजूर केला. तसेच, उत्तरप्रदेशातील नॅशनल हायवे-2 वर वाराणसीपासून हंडिया सेक्शनला सहा लेन करण्याच्या प्रस्तावाला सुद्धा मंजुरी देण्यात आली आहे.