काँग्रेसची संघटनात्मक बांधणी संघाच्या तुलनेत कमकुवत- पी. चिदंबरम

0
11

नवी दिल्ली, दि. 19 – राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपाची संघटनात्मक बांधणी मजबूत आहे. मात्र त्या तुलनेत काँग्रेसचे संघटन कमकुवत असल्याचं मत काँग्रेसचे नेते, माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी मांडलं आहे. कोलकात्यात एका पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते.
कोणत्याही निवडणुकीच्या दिवशी मत स्वतःकडे खेचून आणण्याची क्षमता संघटनेत असावी लागते. त्यासाठी संघटनेची बांधणीही महत्त्वाची असते. मात्र काँग्रेसची संघटनात्मक बांधणी कमजोर असल्याचं म्हणत पी. चिदंबरम यांनी काँग्रेसलाच घरचा आहेर दिला आहे. पण भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं पश्चिम बंगालमधल्या तृणमूल काँग्रेस आणि तामिळनाडूतल्या अण्णा द्रमुक पक्षाच्या विरोधात जनाधार खेचण्याचा प्रयत्न केल्यास निश्चितच त्यांचा पदरी अपयश पडेल, असंही पी. चिदंबरम यांनी सूतोवाच केले आहेत.