शिवसेना खासदारांचे एअर इंडिया, इंडिगोचे तिकीट रद्द, 5 एअरलाइन्सने घातली बंदी

0
10

नवी दिल्ली,दि. २४ -एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला चपलेने झोडपल्याचे अभिमानाने सांगणारे शिवसेनेचे खासदार रवींद्र गायकवाड आज पुन्हा एअर इंडियाच्या फ्लाइटने प्रवास करणार होते, मात्र एअर इंडियासह इंडिगोने त्यांचे तिकीट रद्द केले आहे. गायकवाड यांना त्यांच्या गैरवर्तनाबद्दल अजूनही खेद ना खंत आहे. त्यांची मुजोरीची भाषा थांबलेली नाही. परिणामी पाच एअरलाइन्सनी त्यांच्यावर बंदी घातली आहे.
गायकवाड यांनी आज सेनेच्या ज्येष्ठ नेत्यांची भेट घेऊन स्पष्टीकरण दिले आहे. ते आज पुन्हा विमान प्रवास करणार असल्याची चर्चा आहे, त्यामुळे दिल्ली विमानतळावर काय होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यासोबतच शिवसेना आपल्या चप्पलमार खासदारावर कारवाई करणार की त्यांना बक्षिसी देणार हे पाहाणेही महत्त्वाचे ठरणार आहे.