GST म्हणजे गुड अॅन्ड सिम्पल टॅक्स -मोदी; मध्यरात्री संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये बटण दाबून लागू

0
11
नवी दिल्ली-देशातील आजवरच्या सर्वात मोठ्या कर सुधारणेचा प्रारंभ शुक्रवारी संसदेच्या ऐतिहासिक सेंट्रल हॉलमध्ये झाला. रात्री १२ वाजता राष्ट्रपती प्रणव मुखर्जी व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकत्रित बटण दाबून ही नवी करव्यवस्था लागू केली. जीएसटी लागू करणारा भारत १६१ वा देश ठरला. यासाठी देशाला १७ वर्षे लागली. संसदेचा सेंट्रल हॉल याचा साक्षीदार ठरला.
 ठळक बाबी…
– १७ वर्षांच्या प्रयत्नांनंतर जीएसटी लागू करणारा भारत १६१वा देश
– आजपासून कराचे चार टप्पे ५, १२, १८ आणि २८%, मद्य-पेट्रोल मात्र जीएसटीबाहेर
– जम्मू-काश्मीरमध्ये तूर्त लागू नाही. राज्यात बाहेरून येणाऱ्या, जाणाऱ्या मालावर दुप्पट कर
– स्वातंत्र्यानंतर प्रथमच एखाद्या भव्य ऐतिहासिक कार्यक्रमापासून काँग्रेस पक्ष दूर राहिला.आज खूप आनंद वाटला. मला खात्री होती जीएसटी देशात लागू होईलच. माझ्यासाठी हा ऐतिहासिक क्षण आहे. कारण, अर्थमंत्री असताना मी यासाठी अनेकदा पुढाकार घेतला.
-राष्ट्रपती प्रणव मुखर्जी