स्वातंत्र्यानंतरही ओबीसींना त्यांचे हक्क नाकरले जात आहेत-ड़ॉ.बोपचे

0
16

नवी दिल्ली,दि.08-ब्रिटीश काळातील जनगणनेच्या आधारे देशात ओबीसींचा वाटा ५२ टक्के असल्याचे सिद्ध झाले आहे. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर होणाऱ्या प्रचंड विरोधाला न जुमानता संविधानकर्त्यानीं घटनेत ओबीसींच्या हक्कांना कलम ३४० अंतर्गत संरक्षण दिले. मात्र. मनुवादी व्यवस्थेने ते ७० वर्षानंतर सुद्धा त्या समाजाला मिळू दिले नाही. हा समाज शेतकरी वर्गात मोडत असल्याने देशाच्या आर्थिक व्यवस्थेचा तो कणा आहे. जगाचा पोशिंदा असलेल्या या समाजाला आपल्या देशात शैक्षणिक, सामाजित आणि आर्थिक सोईसवलती पासून वंचित ठेऊन त्यांचे शोषण सुरू आहे. हत्तीसारख्या असलेल्या या समाजाला त्यांचे हक्क ही मिळू नये आणि न्यायासाठी धावा केला तर त्यांची संख्या ज्ञात नसल्याचे कारण पुढे केले जाते. यासाठी ओबीसींची जणगणना केली जावी. स्वातंत्र्यानंतर या समाजाने खूपकाही सहन केले आहे. त्यांचे नैसर्गिक हक्क आता कोणीही नाकारू नये, असा इशारा राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राजकीय समन्वयक तथा माजी खासदार ड़ॉ. खुशालचंद्र बोपचे यांनी ओबीसींच्या राष्ट्रीय महाअधिवेशनाच्या दुसर्या सत्राचे अध्यक्ष म्हणून बोलतांना व्यक्त केले.
समारोपीय सत्राचे अध्यक्ष म्हणून राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे सयोंजक प्राचार्य बबनराव तायवाडे हे होते.यावेळी मंचावर महाधिवेशनाचे उदघाटक माजी न्यायमुर्ती व्ही.ईश्वरैय्या,भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघाचे खासदार नानाभाऊ पटोले,ओबीसी सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष इंजि.प्रदिप ढोबळे,माजी कुलपती पी.सी.पतजंली,प्राचार्य अशोक जिवतोडे, आ.परिणय फुके,माजी आमदार सेवक वाघाये, पी सी पतंजली,कृष्णँया गौंड,श्रीनिवास गौड,माजी आमदार विजय वडेट्टीवार,सचिन राजुरकर आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलतांना खासदार नाना पटोले म्हणाले की, कलम ३४० च्या आधाराव आम्हाला न्यायीक अधिकार मिळायला अधिक वेळ लागणार नसल्याची मी या ओबीसी महाधिवेशनाच्या निमित्ताने ग्वाही देत आहे.राजकारणात खुर्ची गेली की खुर्ची आठवते परंतु आपण ओबीसीसाठी सदैव काम करत आहे.आज ज्या प्रमाणाता देशात शेतकरी आत्महत्या करीत आहे तो चिंतनाचा विषय आहे यावर आपल्याला लक्ष केंद्रित करावे लागणार आहे.शेतकरी शेतीसाठी सावकार,बँकाकडून कर्ज घेऊन पत्नीचे दागिणे गहाण ठेवून पिकाचे उत्पादन घेण्याचे प्रयत्न करतो परंतु त्याच शेतकर्याला स्वतच्या उत्पादित मालाचे भाव ठरविण्याचे अधिकार नाहीत त्यांना तो अधिकारी मिळावा यासाठीचा ठराव आज या महाधिवेशनाच्या माध्यमातून व्हावे अशी अपेक्षा मी व्यक्त करीत आहेत.आजचा मिडिया हा जो पैसा देईल त्यासोबत असल्याने आपल्याला ते किती संधी देतील किती प्रसिध्दी देतील याबाबत शंका व्यक्त करीत विचार व्यक्त मांडले.

ओबीसी सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष इंजी.प्रदिप ढोबळे म्हणाले की, बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितेल्या मार्गाने ओबीसींना जावे लागेल, त्याशिवाय आपले ध्येय साध्य होणार नाही. आपले हक्क मिळविण्यासाठी बुलेटपैक्षा बॅलेटवर लोकांचे सरकार सत्तेत आले पाहिजे. ओबीसींनी त्यांच्या हक्कापासून वंचित ठेवून हा देश महासता बनू शकत नाही.आपण सर्वांनी मतभेद सारुन एकत्र येण्याची खरी गरज आहे.
माजी कुलपती डा.पी.सी.पतजंली म्हणाले की, ओबीसी समाजाचा शत्रु दुसरा तिसरा कुणी नसून फक्त ओबीसी समाजच आहे.दक्षिण भारतात ओबीसी समाजासाठी मार्गर्शक असलेले माजी न्यायमुर्ती व्ही ईश्वरैय्या यांनी ओबीसी समाजाच्या हक्कासाठी चांगले कार्य केले आहे त्यांनी मिशन स्वरुपात शासन दरबारी ओबीसींच्या न्याय हक्कासाठी सातत्याने लढा देत आहेत.ओबीसी असल्यावर आपल्या सर्वांना गर्व असायला हवे आजचे युवक मात्र स्वतला ओबीसी मानायला तयार नाहीत,ही शोकांतिका आहे.ओबीसीच्या आयोगाला सवैंधानिक दर्जा देण्यासाठी राज्यसभेत ज्या पध्दतीने काँग्रेस व भाजपने भूमिका बजावली ही भूमिकाच संशयास्पद असल्याने आयोगाला जो सवैधानिक दर्जा मिळण्याची वेळ आली होती,ती पुन्हा टाळली गेली.ओबीसींचे मंत्रालया जोपर्यंत होणार नाही,तोपर्यत ओबीसींचा विकास शक्यच नाही.यावेळी ओबीसी चळवळीमध्ये काम करणार्यांचा सत्कार करण्यात आला.संचालन मनोज चव्हाण व आभार शरद वानखेडे यांनी मानले.