दिवाळीपर्यंत पेट्रोल-डिझेलचे दर कमी होण्याची शक्यता- धर्मेंद्र प्रधान

0
8

अमृतसर, दि.19(वृत्तसंस्था)- दिवाळीपर्यंत पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी होऊ शकतात, असे संकेत केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेद्र प्रधान यांनी दिले आहेत. पेट्रोल आणि डिझेलचे दर रोज बदलले जातात. त्यामुळे सध्या पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढले आहेत. पेट्रोल-डिझेलच्या या वाढलेल्या दरांवर सर्व स्तरातून टीका होते आहे. सर्वसामान्यांबरोबरचविरोधकांकडूनही सरकारवर टीकेचा भडीमार केला जातो आहे.  सरकारच्या या धोरणावर विरोधकांकडून टीका झाल्यानंतर धर्मेंद्र प्रधान यांनी पेट्रोल-डिझेलचे दर दिवाळीपर्यंत कमी होण्याची शक्यता वर्तविली आहे.

केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना या महिन्यात कॅबिनेट मंत्री म्हणून बढती दिली असून त्यांना कौशल्य विकास आणि उद्योजक मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे. युएसमध्ये आलेल्या पुरामुळे तेलाच्या निर्मीतील 13 टक्क्यांनी घट झाली म्हणूनच रिफायनरी तेलाच्या किंमती वाढल्याचं धर्मेंद्र प्रधान यांनी सांगितले.