बिघडली सोनियांची तब्येत, पोटदुखीच्या त्रासानंतर दिल्लीच्या रुग्णालयात दाखल

0
12
नवी दिल्ली,दि.27(वृत्तसंस्था) – शिमल्याला गेलेल्या सोनिया गांधी यांना घाई-घाईने दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सोनिया गांधी सध्या डॉक्टरांच्या देखरेखीखाली असल्याचे काँग्रेसमधील सुत्रांनी सांगितले आहे.
हॉस्पिटलचे चेअरमन डॉ. डी.एस. राणा यांनी दिलेल्या माहितीनुसार सायंकाळी पाच वाजता सोनिया गांधींना रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोटदुखीच्या त्रासामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून सोनिया गांधींची तब्येत ठीक नाही. याचवर्षी 8 मे रोजी सोनिया गांधींना फूड पॉइझनिंगमुळे सर गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तर गेल्यावर्षी वाराणसीमध्ये एका निवडणूक प्रचार सभेदरम्यानही त्यांची तब्येत बिघडली होती.