तो व्हिडीओ दरेकसा येथील नव्हे तर भोपाल-इटारसीमार्गावरील

0
14

गोंदिया,दि.2 : कलकत्ता-मुंबई रेल्वेमार्गावरील सालेकसा तालुक्यातील दरेकसा घाटामध्ये वाघाचा रेल्वे रुळावर मुक्त संचाराचा व्हिडिओ व फोटो व्हॉट्सअ‍ॅपवरून व्हायरल झाल्याने गोंदिया जिल्ह्यात चर्चेला उधाम आले. पट्टेरी वाघ, रेल्वे रुळ, बोगदा अन् जंगल असा दिसणारा परिसर व्हिडिओत बघून अनेकांनी दरेकसाजवळील हाॅजराफाॅलजवळचा भाग असल्याचाच विश्वास ठेवला; मात्र याबाबत अधिक तपास केला असता व्हिडीओमधील पोल क्रमांक 776/7 हा इटारसी-भोपाल रेल्वे मार्गावरील असल्याचे स्पष्ट झाले आहे.
पट्टेरी वाघाच्या व्हॉटस्अ‍ॅपवरील व्हिडिओमधील पोल क्रमांक ७७६/७ व बोगदा मध्यप्रदेशमधील इटारसी-भोपालच्या मार्गावर आहे. बुदनी-बरखेडा या दोन लहान रेल्वे स्थानकाच्या मध्यभागी हा पोल असून इटारसी रेल्वे स्थानकापासून भोपालकडे येताना ३५ किलोमीटरवर हा पोल आहे.