बस आणि ट्रकला ‘फास्टटॅग’ 1 डिसेंबरपासून बंधनकारक

0
7

नवी दिल्ली,दि.03 – ट्रक किंवा बसला येत्या एक डिसेंबरपासून ‘फास्टटॅग’ बंधनकारक करण्यात येणार आहे. भूपष्ठ परिवहन मंत्रालयाने या संदर्भात एक आदेश जारी केला आहे. बस किंवा ट्रक उत्पादक किंवा डीलरलाच असा टॅग बसवून ग्राहकांना द्यावा लागणार आहे.

हा ईलेक्ट्रॉनिक पध्दतीचा टॅग लावल्यामुळे टोल नाक्यावर पैसे देण्यासाठी लागणारा वेळ वाचणार असून त्या वाहनचालकाच्या खात्यातून पैसे वळते होणार आहे. यामुळे टोल नाक्यावर होणारी वाहनांची गर्दी काही प्रमाणात कमी होण्याची शक्यता आहे. तसेच नेहमी होणारे वादही टळणार आहेत. गुरूवारपर्यंत देशभरात सुमारे साडे सात लाख ‘फास्टटॅग’ ची विक्री झाली होती. येत्या 1 डिसेंबरपासून सर्व बस आणि ट्रकच्या काचेवर अशा प्रकारचे टॅग बसवल्यानंतरच त्यांची आरटीओकडे नोंदणी होणार आहे.