आ.भांगडियांच्या कार्यालयात विकासकामावंर बैठक

0
10

चिमूर,दि.03- चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर विधानसभा मतदारसंघातील विविध प्रलंबित विकासकामांच्या प्रश्नांबाबत  चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार बंटिभाऊ भांगडिया यांच्या उपस्थितीत आढावा बैठक घेण्यात आली.या बैठकीला चिमूर नगर परिषद मुख्यधिकारी मनोज कुमार शाह, सार्वजनिक बांधकाम  विभागाचे उपअभियंता श्री टिकले आणि इतर अधिकारी उपस्थित होते.यावेळी आ.भांगडिया  यांनी सर्व अधिका-याशी चर्चा करून त्यांना विविध विकासकामे लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. यात प्रामुख्याने चिमूर येथील किल्ल्याचे साैंदर्यीकरण, आठवडी बाजाराची कुंपण भिंत, बाजारातील ओटे तयार करणे, लाईटची व्यवस्था, बाजाराचे प्रवेश द्वार आणि जिम व्यायाम शाळा यांचे काम प्राधान्याने पूर्ण करण्याचा सूचना यावेळी दिल्या.  तसेच वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची कर्मभूमी, तपोभूमी गोंदुळा येथील भक्तनिवास स्थान, सभागृह, ध्यान केंद्र इत्यादींचे बांधकाम २ जानेवारीला आयोजित होणा-या यात्रेपूर्वी पूर्ण करण्याचा सूचनाही बांधकाम विभागाच्या अधिकऱ्यांना दिल्या. त्याचप्रमाणे चिमूरच्या आसपासची मंजूर रस्त्यांची कामे लवकरात लवकर मार्गी लावण्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी चिमूर नगर परिषद अध्यक्षा शिल्पाताई समीर राचलवार, नगरसेवक संजय खाटीक, सतीश जाधव,  उषाताई हिवरकर, भारती ताई गोडे, नितीन कटारे, नन्नावरेताई, छायाताई कांचलवर आदि उपस्थित होते.