आमगाव व सालेकसा सार्वत्रिक निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर

0
9

गोंदिया,दि.९ : जिल्ह्यातील नवनिर्मित नगरपरिषद आमगाव व नगरपंचायत सालेकसा सार्वत्रिक निवडणूक व अध्यक्ष पदाची थेट निवडणूक कार्यक्रम २०१७ राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. त्यानुसार १४ नोव्हेंबर- जिल्हाधिकारी हे निवडणूक कार्यक्रम प्रसिदी करतील. १८ ते २४ नोव्हेंबर- सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत नामनिर्देशनपत्र राज्य निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या संकेतस्थळावर भरण्याकरीता उपलब्ध असण्याचा कालावधी. १८ ते २४ नोव्हेंबर- सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत नामनिर्देशनपत्रे स्विकारण्याचा कालावधी. रविवार १९ नोव्हेंबर रोजी सुट्टी असल्याने नामनिर्देशनपत्र देण्यात अथवा स्विकारण्यात येणार नाहीत. २५ नोव्हेंबर- सकाळी ११ वाजेपासून नामनिर्देशनपत्राची छाननी व वैधरित्या नामनिर्देशीत झालेल्या उमेदवारांची यादी प्रसिध्द करणे. ३० नोव्हेंबर- अपील नसेल तेथे दुपारी ३ वाजेपर्यंत नामनिर्देशनपत्रे मागे घेण्याचा अंतिम दिनांक. अपील असल्यास अपिलाचा निर्णय ज्या तारखेस करण्यात येईल त्या तारखेनंतर तिसऱ्या दिवशी किंवा तत्पूर्वी. उमेदवारी मागे घेण्यासाठीच्या शेवटच्या दिवसानंतरच्या लगतच्या दिवशी निवडणूक चिन्ह नेमूण देण्याचा तसेच अंतिमरित्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिध्द करणे. १३ डिसेंबर रोजी सकाळी ७.३० पासून ते सायंकाळी ५.३० पर्यंत मतदान घेण्यात येईल. १४ डिसेंबर- सकाळी १० वाजेपासून मतमोजणी व निकाल जाहीर करण्यात येईल.