SC चे 4 न्यायमूर्ती नाराज, म्हणाले-लोकशाही कशी टिकेल

0
10

नवी दिल्ली(वृत्तसंस्था)दि.12– देशाच्या इतिहासामध्ये प्रथमच सुप्रीम कोर्टाच्या न्यायमूर्तींनी आज शुक्रवारी पत्रकार परिषद घेतली. न्यायमूर्ती जे चेलमेश्वर यांच्या घरी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. कोर्टाचे कामकाज योग्य पद्धतीने सुरू नसल्याचे सांगत त्यांनी नाराजी व्यक्त केली. जे चेलमेश्वर यांच्याबरोबर रंजन गोगोई, माधव बी लोकूर आणि कुरीयन जोसेफ हे पत्रकार परिषदेत उपस्थित होते.

काय म्हणाले न्यायमूर्ती…

> ही एक खास वेळ आहे. भारताच्या इतिहासात असे कधीही झालेले नाही.
> गेल्या काही महिन्यांपासून सुप्रीम कोर्टाचे प्रशासन योग्य काम करत नसल्याचे दिसत आहे.
> याप्रकरणी आम्ही सरन्यायाधीशांकडेही म्हणणे मांडले, पण त्याचा फायदा झाला नाही.
> त्यामुळे आम्हाला ही पत्रकार परिषद आयोजित करावी लागली आहे.
> आम्हाला देशातील जनतेला सर्वकाही सांगायचे आहे.

> न्यायव्यवस्था टिकली नाही तर लोकशाही टिकणार नाही.
> यापूर्वी न्यायव्यवस्थेत अशा प्रकारच्या गोष्टी घडल्या नाहीत

> खटल्यांच्या वाटपाबाबत काही तक्रारी आहेत. आम्ही दिलेल्या पत्रामध्ये आमचे म्हणणे मांडले आहे, असे गोगोई म्हणाले.
> सीबीआयचे जज लोया प्रकरणाशी हे संबंधित आहे का असे विचारले असता, लोयांनी हो असे उत्तर दिल्याचे न्यूज एजन्सीने म्हटले आहे.