राज्यसभेवर गुलाम नबी आझाद यांची फेरनिवड

0
9

जम्मू : शनिवारी जम्मू-काश्मिरातून राज्यसभेच्या चार जागांसाठी घेण्यात आलेल्या निवडणुकीत कॉंग्रेस नेते व राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद विजयी झाले आहेत. पीडीपीने आपले दोन सदस्य संसदेच्या या वरिष्ठ सभागृहात पाठविले असून, भाजपाचाही एक सदस्य विजयी झाला. कॉंग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्सचे संयुक्त सदस्य असलेले आझाद, पीडीपीचे फय्याज अहमद मिर व नाझिर अहमद तसेच भाजपाचे समशेर सिंग मानहास यांना विजयी घोषित करण्यात आले आहे. ८७ सदस्यीय राज्य विधानसभेत पीडीपीला २८, भाजपाला २५, नॅशनल कॉन्फरन्सला १५ आणि कॉंगे्रसला १२ जागा मिळाल्या आहेत.