मेघालयमध्ये कोनराड संगमा यांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ

0
9
शिलाँग(वृत्तसंस्था),दि.06– नॅशनल पिपल्स पार्टी (एनपीपी) चे नेते कोनराड संगमा यांनी मंगळवारी मेघालयच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. या शपथविधी सोहळ्यात अमित शाह आणि राजनाथ सिंह यांचाही समावेश होता. मेघालयच्या आघाडी सरकारमध्ये भाजप, एनपीपी, युनाइटेड डेमोक्रॅटिक पार्टी (युडीपी), हिल स्टेट पिपुल्स डेमोक्रॅटिक पार्टी (एचएसपीडीपी) आणि पिपल्स डेमोक्रॅटिक फ्रंट (पीडीपी) यांचा समावेश आहे. 21 जागा जिंकणाऱ्या काँग्रेसला सत्ता स्थापण्यात यश आलेलेल नाही. तर भाजपला फक्त दोन जागा मिळाल्या आहेत.
 रविवारी सायंकाळी कोनराड यांनी राज्यपाल गंगाप्रसाद यांची भेट घेऊन सत्ता स्थापनेचा दावा केला होता. तसेच त्यांनी 34 आमदारांच्या समर्थनाचे पत्रही सादर केले होते.
राज्यपालांना भेटल्यानंतर कोनराड संगमा म्हणाले, आघाडीचे सरकार चालवणे सोपे नसते, पण मला माहिती आहे की, आमच्याबरोबर आलेले आमदार राज्य आणि जनतेप्रती वचनबद्ध आहेत. आम्ही राज्याच्या विकासासाठी मिळून मिसळून काम करू.भाजपचे हेमंत बिस्वा म्हणाले की, कोनराड संगमा राज्याचे मुख्यमंत्री असतील. नव्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री नसेल. आघाडीत सहभागी झालेल्या प्रत्येक पक्षाच्या दोन दोन आमदारांपैकी एकाचा सत्तेत समावेश असेल.
 कोनराड संगमा यांचा जन्म 27 जानेवारी, 1978 ला झाला होता. मेघालयचे माजी मुख्यमंत्री (1988-91) आणि लोकसभेचे माजी अध्यक्ष (1996-98) राहिलेल्या पीए संगमा यांचे पुत्र आहेत. त्यांची बहीण अगाथा संगमा काँग्रेसच्या युपीए सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री राहिलेले आहे. कोनराड यांचे भाऊ जेम्स संगमा गेल्या विधानसभा (2013-18) मध्ये विरोधीपक्ष नेते होते.
– त्याशिवाय कोनराड सेल्सेसामधील आमदार आणि विरोधीपक्ष नेते राहिलेले आहेत.
– ते साऊथ तुरा मतदारसंघातील सदस्य आहेत.