ममता बॅनर्जीच्या नीकटवर्तीय उद्योगपतीला विमानतळावर अटक

0
5

कोलकाता – पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याबरोबर बांग्लादेश दौऱ्यावर गेलेल्या एका उद्योगपतीला परतताच विमानतळावर अटक करण्यात आली आहे. शिवाजी पांजा नावाच्या या उद्योगपतीला विमानतळावर उतरताच अटक करण्यात आली. ममतांचे नीकटवर्तीय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पांजा यांच्याविरोधात आर्थिक घोटाळ्याप्रकरणी आरोप आहेत.
दिल्ली पोलिसांची लूकआऊट नोटीस
आर्थिक घोटाळा प्रकरणी शिवाजी यांच्या विरोधात 19 फेब्रुवारीला दिल्ली पोलिसांनी लूकआऊट नोटीस काढली होती. त्यानंतर पोलिसांनी कारवाई करण्याआधीच शिवाजी पांजा ममता बॅनर्जींबरोबर शिष्टमंडळाबरोबर बांगलादेशला रवाना झाले होते. या अटकेनंतर कोलकाता विमानतळावरून दिल्ली पोलिसांना माहिती देण्यात आली आहे. आता दिल्ली पोलिसांचे एक पथक कोलकात्याला जाऊन शिवाजी यांना चौकशीसाठी रिमांडवर घेतील. त्याआधी अटकेनंतर शिवाजी यांनी तब्येत बिघडल्याची तक्रार केली होती. त्यानंतर त्यांना रुग्णालयातही दाखल करण्यात आले होते. रविवारी पोलिसांनी शिवाजी यांनी बॅरकपूर न्यायालयात हजर केले.