आंतरजातीय विवाह करा आणि मिळवा एक लाख रुपये !

0
23

चंदीगड : आंतरजातीय विवाह योजनेअंतर्गत हरियाणा सरकारतर्फे दिली जाणारी रक्कम ५० हजार रुपयांवरुन एक लाख रुपये करण्याची घोषणा केली आहे.

हा निर्णय हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत घेण्यात आला आहे. ‘या योजनेतील रकमेत वाढ केल्याने आंतरजातीय विवाहांची संख्या वाढेल आणि समाजातील जातीय भेदभाव नष्ट होण्यास मदत होईल, असे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी सांगितले.
मुख्यमंत्री खट्टर यांनी ही योजना जन धन योजनेशी जोडू, असे म्हटले. लोकांपर्यंत आर्थिक मदत कोणत्याही अडथळ्यांशिवाय आणि वेळेत पोहोचण गरजेचे असल्यामुळे ही मदत पंतप्रधान जन-धन योजनाअंतर्गत मिळायला हवी, असेही खट्टर म्हणाले.

याआधी वर्षाच्या सुरुवातील बिहार सरकारनेही आंतरजातीय विवाह करणाऱ्यांना 50 हजार रुपये देण्याची घोषणा केली होती. राज्य सरकारतर्फे देण्यात येणारी ही रक्कम वधूच्या खात्यात जमा करण्यात येते.