20 रुपयांची नवीन नोट येणार, जाणून घ्या खासियत!

0
25

नवी दिल्ली,दि.27(एंजसी) – आपल्या हातात नवीन 500 आणि 200 रुपयांच्या नवीन नोटा येणार असल्याची माहिती काही दिवसांपूर्वी आरबीआयने दिली होती. त्यानंतर आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) लवकरच 20 रुपयाची नवी नोट चलनात आणणार आहे. भारतीय चलन व्यवस्थेमध्ये नवीन वैशिष्टये आणि नव्या रंगातील 20 रुपयांची नोट चलनात आणली जाणार आहे. महात्मा गांधी सिरीज असलेल्या नव्या नोटांवर भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांची सही असणार आहे. 20 रुपयाच्या नव्या नोटेचा रंग हा हिरव्या आणि पिवळया रंगाच्या मिश्रणातील हिरवट पिवळा रंग असणार आहे. या नोटेच्या मागील बाजूस वेरुळ लेणींचे चित्र असणार आहे. महात्मा गांधी सिरीज असलेल्या नव्या नोटांवर गव्हर्नर शक्तिकांत दास यांची सही असणार आहे. 20 रुपयाच्या सध्या चलनात असलेल्या नोटांचा देखील वापर कायम राहणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. नव्या नोटेचा आकार हा 63mmx129mm असणार असल्याची माहिती आरबीआयने दिली आहे.