बी.एल.ओ.संघटना अध्यक्षपदी प्रविण कोचे तर सचिवपदी एस.एस.ठाकुर यांची निवड

0
25

गोंदिया,दि.27ः-. मतदान केंद्र स्तरिय अधिकारी (बी.एल.ओ.) ची बैठक नुकतीच नुतन शाळा, मामा चौक, गोंदिया याठिकाणी  बी.एल.ओ. मिना वासनिक यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. बैठकमध्ये सर्वानुमते अध्यक्षपदी प्रविण कोचे व सचिवपदी एस.एस. ठाकुर यांची निवड करण्यात आली.
आपल्या भारत देशात लोकशाही पध्दत आहे. लोकशाही मध्ये लोकांचे मत प्रदर्शन मताद्वारे व्यक्त केले जाते. आणि याकरिता निवडणुक घेतली जाते. मतदान प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडण्यामध्ये मतदान केंद्र स्तरिय अधिकारी (बी.एल.ओ.) यांची महत्वाची भूमिका राहत असून मतदान व मतदार यामधील महत्वाचा दुवा म्हणून हे बीएलओ कार्य पार पाडतात.
बैठकमध्ये बी.एल.ओ.चे कार्य करित असलेले मुख्याध्यापक, शिक्षक, नगर परिषद कर्मचारी, पोलीस पाटील, आंगणवाडी सेविका, आशा सेविका उपस्थित होते. बैठकमध्ये बी.एल.ओ. यांनी कार्य करित असतांना आपणास येत असलेल्या अडचणी व अनुभव सांगीतले. व त्या अडचणी दूर करण्यासाठी बी.एल.ओ.चे संघटन असणे गरजेचे आहे. असे चर्चेअंती ठरले. बीएलओ च्या या अडचणींना दूर करण्यासाठी कार्यकारिणीचे गठन करण्याचे सर्वानुमते ठरले.
त्यानुसार बी.एल.ओ.संघटना बनवून कार्यकारिणी खालिलप्रमाणे पदाधिकाऱ्यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
संघटक (मुख्याध्यापक) दिनेश पटले,संघटक (पोलीस पाटील) लक्ष्मीकांत कोल्हे, अध्यक्ष (पोलीस पाटील) प्रविण कोचे, सचिव (शिक्षक) एस.एस.ठाकुर,उपाध्यक्ष (नगर परिषद कर्मचारी) माधुरी खोब्रागडे, व, उपाध्यक्ष (आशा सेविका) चंदा ऊके,सहसचिव (आंगणवाडी सेविका) कल्पना पटले, कोषाध्यक्ष (पोलीस पाटील) पन्नालाल रहांगडाले,सभासद  शिल्पा राऊत, माधुरी खापर्डे, अश्विनी कावळे, दिपीका मेश्राम, कविता पारधी, चांदनी मेश्राम, आशा शिवणकर, के.बी.लिल्हारे, देवेंद्र नागपुरे, इंदुमती रहांगडाले, सुनिता रहमतकर, आशा मस्करे व सुनिता पटले यांचा समावेश आहे.