मध्य प्रदेशात वाळू माफियांनी पोलिसाला चिरडले

0
14

मोरेना – मध्य प्रदेशातील मोरेना जिल्ह्यात वाळू माफियांनी एका पोलिस कर्मचाऱ्याला ट्रकखाली चिरडल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

देशभरात वाळू माफियांकडून होत असलेले हल्ले घडत असतानाच आता ही घटना समोर आली आहे. अवैधरित्या वाळू उपसा करून जात असलेल्या ट्रकला रोखण्याचा पोलिस कॉन्स्टेबल धर्मेंद्र चौहान यांनी रोखण्याचा प्रयत्न केला. पण, ट्रक चालकाने त्यांच्यावर अंगावर गाडी घालून त्यांना चिरडले. यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला.

कर्नाटकमधील आयएएस अधिकारी डी. के. रवी यांचा घरात मृतदेह सापडल्यानंतर, त्यांच्या मृत्यूबद्दल शंका व्यक्त करण्यात येत आहेत. रवी यांनी वाळू माफियांविरुद्ध धडक मोहिम राबविली होती. या प्रकरणाचा तपास सीबीआय करत आहे.