चक्रवर्ती राजा भोज यांच्याबद्दल अपशब्द काढणार्याच्या समाजसंघटनेने नोंदविला निषेध

0
18

गोंदिया,दि.28~ राष्ट्रिय पवार क्षत्रिय महासभा,पवार प्रगतिशिल मंचच्यावतीने भोपाल नगर निगमचे विरोधी पक्षनेते मोहम्मद सागीर यांनी पवार समाजाचे प्रेरणास्त्रोत चक्रवर्ती राजा भोज यांच्याबद्दल तथाकथित टिप्पणी केल्याप्रकरणात तसेच काँग्रेस नगरसेवक मोहम्मद अब्जुल शरीफ यांनी राजाभोज यांचे चित्र लावण्यास केलेला विरोधाचा निषेध नोंदवित मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांना निवेदन पाठवून घटनेचा निषेध नोंदवित संबधितावर त्वरीत कडक कारवाई करण्यासंबधीचे निवेदन आज(दि.28) देण्यात आले.
निवासी उप जिल्हाधिकारी हरिष धार्मिक यांचामार्फत मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांना  हे निवेदन पाठवण्यात आले.  शरीप व नगर निगमचे विरोधी पक्षनेता मोहम्मद सगीर यानी सार्वजनिकरित्या माफी मांगावी असेही निवेदनात म्हटले आहे. निवेदन देतेवेळी राष्ट्रिय संघटन सचिव खेमेंद्र कटरे,प्रगतीशिल मंच अध्यक्ष डॉ कैलास हरिणखेडे, जनसवांद सचिव डॉ संजिव रहागंडाले,  प्रा.संजय रहाहंडाले,अड टि.बी.कटरे,महासभा कार्य.सदस्य अड रुपेंद्र कटरे,अड पी.सी.चव्हान,प्रविन बिसेन,महेंद्र बिसेन,किशोर भगत,सुरेश पटले,विक्की बघेले,छत्रपाल तुरकर,गुलाब ठाकूर,सचिन रहागंडाले,पप्पू पटले,संदिप रहाग़डाले,अड विजय पटले,डी.डी.पटले,प्यारेलाल पटले,एस.यु.पटले,मुकेश कटरे,दादुराम बिसेन,विश्वनाथ रहागंडाले,के.ई.भगत यांच्यासह ओबीसी संघटनेचे मनोज मेंढे,कैलास भेलावे,कमल हटवार,एस.यु.वंजारी,एल.यु.खोब्रागडे,प्रेमलाल साठवने आदी समाजबांधव उपस्थित होते

भंडारा पोवार समाजानेही नोंदविला निषेध,जिल्हाधिकारी मार्फेत प्रधानमंत्र्याना पाठविले निवेदन

पोवार समाजाचे आराध्य दैवत चक्रवर्ती राजाभोज यांचा अपमान करणाऱ्या भोपालच्या माथेफिरू मोहम्मदला अटक करावी या मागणीचे निवेदन भंडारा जिल्हा पोवार समाज संघटनेच्यावतीने जिल्हाधिकारी भंडारा यांच्यामार्फेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना पाठविण्यात आले. निवेदन देतेवेळी संघटनेचे पदाधिकारी चेतन भैराम,संजय पटले,मयूर बिसेन,नरेश बोपचे,एम. जी. बिसेन, चंद्रशेखर राहांगडाले,देवचंद चौधरी,विजय पारधी,मुन्ना राहांगडाले,डिलेश्वर राहांगडाले,जिल्हा परिषदेचे शिक्षण व आरोग्य सभापती धनेंद्र तुरकर आदी उपस्थित होते.

मध्यप्रदेशात ठिकठिकाणी निवेदने,सागिरच्या पुतळ्याचे दहन

मध्यप्रदेशातील इंदोर,बालाघाट,बैतुल,छिंदवाड़ा,छत्तीसगड येथील रायपूर,गुढीहारी समाजसंघटनेच्यावतीने आज जिल्हाधिकारी मार्फेत निवेदन देत वरिल घटनेचा निषेध नोंदविण्यात आला.बालाघाट येथे राष्ट्रीय पवार क्षत्रिय महासभा,जिल्हा पवार संघटने,जिल्हा राजाभोज पवार संघटन,पवार व्यवसायिक संघटनेसह इतर सर्व संघटनानी एकत्र येत जिल्हाधिकारी यांच्या मार्फेत निवेदन पाठवित मो.सागीर यांच्यावर कडक कारवाईची मागणी केली.तसेच भोपाल महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते मो.सागीर  यांच्याविरुध्द स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवित पुतळा जाळण्यात आला.यावेळी राष्ट्रीय पवार क्षत्रिय महासभेच्या महासचिव पुष्पा निरंजन बिसेन,राजाभोज संघटनेचे श्री पारधी,राष्ट्रीय क्षत्रिय पवार महासभेचे सहसचिव मनोज भैरम यांच्यासह बालाघाट येथील पोवार समाज संघटनेचे स्थानिक सर्व पदाधिकारी व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.