24.2 C
Gondiā
Tuesday, August 11, 2026
Home विदर्भ गोंदिया मुस्लीम मॉयनॉरटी ट्रस्टव्दारा वृक्षारोपण कार्यक्रम

गोंदिया मुस्लीम मॉयनॉरटी ट्रस्टव्दारा वृक्षारोपण कार्यक्रम

0
32
गोंदिया,दि.28 : ग्रीन अर्थ आॅर्गनॉयजेशनच्या वृक्ष दिंडीच्या आगमनावर २७ जून रोजी मरारटोली येथील शादीखानाच्या जागेवर मुस्लीम मॉयनॉरटी ट्रस्टव्दारे त्यांच्या स्वागत करण्यात आला. तसेच शादीखानाच्या ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले.
वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या यावर्षी ३३ कोटी वृक्ष लागवडीचा संकल्पात मुस्लीम मॉयनॉरटी ट्रस्ट सोबत असून पर्यावरणाच्या संवर्धनात सहभागी असल्याचे सांगितले. याप्रसंगी वृक्षदिंडीचे संयोजक आशिष वांदिले,  माजी आमदार हेमंत पटले, माजी आमदार रमेश कुथे,   माजी जि.प.उपाध्यक्ष विनोद अग्रवाल, शहर अध्यक्ष सुनिल केलनका, रामनगरचे ठाणेदार इंगळे, संजय कुलकर्णी, संतोष चव्हाण, भाऊराव उके, नगरसेवक जितेंद्र पंचबुध्दे, नगरसेविका अफसाना पठाण, गजेंद्र फुंडे व त्यांच्या चमुचे स्वागत करण्यात आले. यावेळी मुस्लीम मॉयनॉरटी ट्रस्ट अध्यक्ष सैय्यद अस्लम अली, बशीरूद्दीन कादरी, इफ्तखार खान, सैय्यद जाकीर, हाजी गुलाम कदीर, लतिफ खान, नईम शेख, नईम खान, सोलु तिगाला, सलमान शेख, बंटी भाई, सबील भाई आदिसह ट्रस्टचे पदाधिकारी उपस्थित होते.यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीत मुस्लीम मॉयनॉरटी ट्रस्टच्या शादीखानाच्या जागेवर वृक्षारोपण करण्यात आले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन अहमद मनिहार यांनी केले.
blank