साध्वी प्रज्ञा, कर्नल पुरोहित यांना दिलासा

0
10

वृत्तसंस्था
नवी दिल्ली- मालेगाव स्फोट प्रकरणातील आरोपी साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर आणि कर्नल श्रीकांत पुरोहित या दोघांना न्यायालयाने दिलासा दिला आहे. त्यांच्याविरुद्ध मोक्का कायद्याअंतर्गत कोणतेही पुरावे मिळाले नाहीत, असे सांगण्यात आले. त्यांच्या जामिनावर कनिष्ठ न्यायालयाने सुनावणी करण्याचे निर्देश दिले आहेत.

आरोपी विशेष न्यायालयात नियमित जामिनाची याचिका दाखल करू शकतात असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. दरम्यान, आरोपी राकेश तावडेच्या विरुद्ध मोक्का कायद्यानुसार पुरावे मिळाले आहेत.

नाशिकजवळील मालेगाव मध्ये २९ सप्टेंबर २००८ रोजी झालेल्या स्फोटांचा कट रचण्याचा आरोप साध्वी प्रज्ञा हिच्यावर आहे. या स्फोटात सहाजणांचा मृत्यू झाला होता. या खटल्यात २३ ऑक्टोबर २००८ रोजी प्रज्ञा ठाकूर हिला अटक करण्यात आली होती.