मसरत आलमच्या पुन्हा देशविरोधी कारवाया

0
15

श्रीनगर – काश्मीरमध्ये भाजपा-पीडीपी आघाडीचे सरकार स्थापन होताच ज्याच्या सुटकेवरुन संसदेसह देशभरात गदारोळ झाला तो फुटीरतवादी नेता मसरत आलमने पुन्हा एकदा देश विरोधी कृत्य केले आहे.
मसरत आलमने बुधवारी श्रीनगरमध्ये भारत विरोधी सभेचे आयोजन केले होते. या सभेमध्य़े आलमने पाकिस्तानी झेंडा फडकवला तसेच पाकिस्तान समर्थनाच्या घोषणाही दिल्या.
देश विरोधी कारवाया केल्याच्या आरोपाखाली चार वर्ष तुरुंगात असणा-या मसरत आलमची मागच्या महिन्यात सात मार्चला तुरुंगातून सुटका झाली होती. मुफ्ती मोहोम्मद सईद यांनी सत्तारुढ होताच लगेचच आलमच्या सुटकेचा निर्णय घेतला होता. त्याच्या सुटकेवरुन संसदेत जोरदार गदारोळ झाला.
संसदेच्या दोन्ही सभागृहात काँग्रेसच्या नेतृत्वाखाली विरोधी पक्षांनी नरेंद्र मोदी सरकारला धारेवर धरले होते.