लोकसभेचा वस्तू आणि सेवा कर विधेयकाला हिरवा कंदील

0
9

नवी दिल्ली – लोकसभेने भारतातील सर्वात मोठी करविषयक सुधारणा आणि सबंध देशात सामायिक अप्रत्यक्ष करप्रणाली ‘वस्तू व सेवा कर – जीएसटी’ विधेयकाला अनुमती दिली असून ३३६ सदस्यांनी आज झालेल्या मतदानात विधेयकाच्या बाजुने मतदान केले.

एप्रिल २०१६ पासून अंमलबजावणी व्हावी म्हणून घटना दुरुस्ती विधेयकाला मंजुरी मिळावी यासाठी अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सदस्यांना विधेयकाच्या बाजुने मतदान करण्याची विनंती केली होती. ‘या विधेयकाच्या बाजूने मतदान करा, अशी मी आपणास कळकळीची विनंती करतो’ , असे जेटली यांनी म्हणाले होते. या विधेयकावर आवश्यक चर्चा झाली आहे. स्थायी समितीने अनेक बैठकांवर बैठका घेतल्यानंतर सर्वानुमते हे विधेयक समोर आले आहे तेव्हा मी आपणास विनंती करतो की राजकीय मतभेद विसरुन आपण हे विधेयक मंजूर करावे, असे जेटली म्हणाले.