सलमान खानला पुन्हा दिलासा, शिक्षेला उच्च न्यायालयाची स्थगिती

0
7

मुंबई – जामीन मिळविण्यासाठी सलमान खान सत्र न्यायालयात दाखल झाला आहे. न्यायालयात तीस हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर त्याची सुटका करण्यात येणार येणार आहे.
सलमानला सुनावण्यात आलेल्या शिक्षेला उच्च न्यायालयाने स्थगिती दिली असून, त्यामुळे सलमान खान सध्या तुरुंगाच्या बाहेर राहणार आहे. त्याला सत्र न्यायालयातून जामीन घेण्यास उच्च न्यायालयाने दि. ८ –मंजुरी दिली आहे. सलमानसाठी हा दिलासादायक निर्णय आहे. दरम्यान, जुलैमध्ये खटला संपविण्याची तयारी ठेवा असे न्यायाधीशांनी सलमानच्या वकिलांना सांगितले.
जामिनासाठी सलमान खान याला सत्र न्यायालयात अर्ज करावा लागणार आहे. तत्पूर्वी शरण जाऊन त्याला जामिनाच्या करारावर स्वाक्षरी करावी लागेल, अशी याची औपचारिकता आहे.
मुंबई सत्र न्यायालयाने २००२ मधील हिट अँड रन प्रकरणी सलमान खान याला दोषी ठरविले असून, त्याला पाच वर्षांचा तुरुंगवास व २५ हजार रुपये दंड ठोठावला होता.