भारताकडे २० दिवस पुरेल इतकाच दारुगोळा

0
12

नवी दिल्ली ,दि. ९– भारतीय लष्कराच्या दारु-गोळा विभागावर कॅगने गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. संसदेत सादर करण्यात आलेल्या अहवालानूसार, लष्कराकडे दारु-गोळ्यांची मोठी कमतरता आहे. त्यामुळे अचानक युद्ध परिस्थिती उद्भवली तर भारताचे पितळ उघडे पडण्याची शक्यता आहे.
कॅगच्या अहवालानुसार, सैन्याकडे युद्धात ४० दिवस पुरेल ऐवढा शस्त्रसाठा असणे अपेक्षीत असते. मात्र भारतीय सैन्य यामध्ये फारच मागे आहे. भारतीय सैन्याकडे २० दिवस पुरेल ऐवढाच दारुगोळा उपलब्ध आहे. त्यामुळे याचा परिणाम सैन्याच्या तयारी तसेच प्रशिक्षणावर होतो.
मार्च २०१३ मधील कॅगने आपल्या अहवालात भारतीय सैन्याकडील युद्धसामुग्रीच्या तुटवड्याबाबत माहिती दिली होती. मात्र त्यानंतरही या परिस्थितीत काही बदल झालेला नाही. भारताला ४० दिवसांसाठीचा पुरेसा दारुगोळा मिळवणे २०१९ पर्यंत शक्य होणार असल्याचा अंदाज आहे. मात्र सद्यस्थिती पाहता हे लक्ष्य गाठणे कितपत शक्य आहे याबद्दल कॅगने शंका व्यक्त केली आहे.
कॅगने यावेळी तेजस या लढाऊ विमानाच्या कार्यक्षमतेवरही सवाल उपस्थित केले. तेजस विमान ३५ टक्के स्वदेशी तंत्रज्ञानाने विकसित आहे आणि हे विमान आवश्यक असलेले ५३ तांत्रिक निकष पूर्ण करत नाही. त्यामुळे तेजस विमान युद्धासाठी सक्षम नसल्याचे असे ‘कॅग’ने म्हटले आहे.