काबुल गेस्टहाऊसवर हल्ला, 4 भारतीयांचा मृत्यू

0
10

नवी दिल्ली दि. १4– अफगाणिस्तानची राजधानी काबुलमधील गेस्टहाऊसमध्ये भारतीय राजदुत असल्याच्या संशयावरुन तालिबान दहशतवाद्यांनी काल (बुधवार) रात्रीच्या सुमारास हल्ला केला होता. विदेशी नागरिकांमध्येही काबुल गेस्टहाऊस अत्यंत लोकप्रिय आहे. हल्ला केल्यानंतर दहशतवाद्यांनी काही लोकांना ओलीस धरले होते. यावेळी उडालेल्या चकमकीत चार भारतीय आणि एका अमेरिकी नागरिकाचा मृत्यू झाला.
काबुलमधील पार्क पॅलेस गेस्टहाऊसवर काल रात्रीच्या सुमारास काही तालिबानी दहशतवाद्यांनी हल्ला केला. याची माहिती मिळाल्यावर स्पेशल फोर्सेससह अफगाण नॅशनल सेक्युरिटी फोर्सेस घटनास्थळी दाखल झाल्या. त्यांनी दहशतवाद्यांना जोरदार प्रत्युत्तर देत ओलिसांना सोडविण्याचा प्रयत्न केला.