नाकर्तेपणा लपविण्यासाठीच आरोप- मनमोहनसिंग

0
9

वृत्तसंस्था
नवी दिल्ली , दि.२७-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार आपला नाकर्तेपणा लपविण्यासाठी माझ्यावर आरोप करून माझी प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करत आहे, असा हल्लाबोल माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी केला आहे.
‘ट्राय‘च्या माजी अध्यक्षांनी 2जी गैरव्यवहार प्रकरणी मनमोहनसिंग यांच्यावर आरोप केले होते. मनमोहनसिंग यांनी आज हे सर्व आरोप धुडकावून लावत, सत्ताधारी भाजपच्या नेत्यांकडून करण्यात येत असलेले आरोप फेटाळले आहेत. मोदी सरकार आपल्या वर्षपूर्तीनिमित्त मागील यूपीए सरकारबाबत चुकीचे दावे करत असल्याचे, त्यांनी म्हटले आहे.
मनमोहनसिंग म्हणाले, ‘आम्ही भ्रष्टाचाराविरोधात लढत होतो आणि यापुढे लढत राहू. मी कधीही आपल्या सरकारी कार्यालयाचा वापर स्वतःसाठी किंवा आपल्या कुटुंबातील व्यक्तींसाठी केलेला नाही. यूपीए सरकारच्या काळात धोरणे दुबळी असल्याची होत असलेली टीका पूर्णपणे चुकीची आहे. जेव्हा मी पंतप्रधान कार्यालय सोडले होते, त्यावेळी भारत चीनपाठोपाठ जगातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात वेगवान अर्थव्यवस्था होती.