बोगस पदवी प्रकरणी दिल्लीचे कायदामंत्री जितेंद्र तोमर यांना अटक

0
13

वृत्तसंस्था
नवी दिल्ली, दि. ९ – बोगस पदवी प्रमाणपत्र सादर केल्याप्रकरणी दिल्लीचे कायदामंत्री जितेंद्र सिंग तोमर यांना अटक करण्यात आली असून केजरीवाल सरकारला मोठा धक्का बसला आहे. दरम्यान हे प्रकरण न्यायप्रविष्ट असतानाही कोणतीच नोटीस न देता तोमर यांना अटक करण्यात आल्याचा आरोप आपच्या नेत्यांनी लावला आहे. तोमर यांना हौसखास पोलिस स्थानकात नेण्यात आले आहे.

तोमर यांनी सादर केलेले ग्रॅज्युएशन व एलएलबीचे प्रमाणपत्र बोगस असल्याचा आरोप त्यांच्यावर लावण्यात आला आहे. भागलपूर युनिव्हर्सिटीतून कायद्याचे शिक्षण घेतल्याचा दावा तोमर यांनी केला होता. मात्र तोमर यांचे प्रमाणपत्र बोगस असून त्याचे संस्थेच्या रेकॉर्ड्समध्ये उल्लेख नसल्याचे युनिव्हर्सिटीतर्फे न्यायालयाला सांगण्यात आले. याप्रकरणी तोमर यांची चौकशी सुरू होती, मात्र ते चौकशीत सहकार्य करत नसल्याचे पोलिसांचे म्हणणे असून त्यामुळे त्यांना अटक करण्यात आली.