माझे उत्तराधिकारी हे चांगले विक्रेते- मनमोहनसिंग

0
13

वृत्तसंस्था नवी दिल्ली, दि. ९ -माझे उत्तराधिकारी हे माझ्यापेक्षा चांगले विक्रेते, उत्तम आयोजक व बोलण्यात पटाईत आहेत, असे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी आज (मंगळवार) म्हटले आहे.

कॉंग्रेसशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या संमेलना दरम्यान बोलताना डॉ. मनमोहनसिंग म्हणाले, ‘मला तंत्रज्ञान कसे तयार करायचे एवढे माहीत आहे. परंतु, माझे उत्तराधिकारी नरेंद्र मोदी हे त्याची चांगल्या प्रकारे विक्री, व्यवस्थापन करत आहे. मोदी सरकार हे यूपीए सरकारने आखलेल्या योजनांचे जोरदार मार्केटींग करून स्वतः श्रेय लाटत आहेत.‘