162 चिटफंड कंपन्यांवर कारवाई करा- सोमय्या

0
9

मुंबई,दि. ९ – महाराष्ट्रात 162 चिटफंड कंपन्यांनी राज्यातील जनतेचे 40 हजार कोटी लुटले आहेत. या चिटफंड कंपन्यांवर राज्य सरकारने कारवाई करावी अशी मागणी भाजपचे खासदार किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. यावेळी खासदार सोमय्या यांनी मुख्यमंत्र्यांना या घोटाळा करणा-या 162 कंपन्यांची यादीच सादर केली आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी याप्रकरणी तातडीने पावले टाकली जातील असे सोमय्यांना सांगितले.
एनमार्ट, केबीसी, समृद्ध जीवन, ऑरेंज हॉलिडेज कंपनी, साईप्रसाद, गरवारे, श्री सुर्या, पर्ल्स, हरी ओम, मीरा, टि्ंवकल आदी चिटफंड कंपन्यांचा यात समावेश आहे. या कंपन्यांकडून अद्याप कोणतेही प्रतिक्रिया आली नाही. समृद्ध जीवन कंपनीचे मालक महेश मोतेवार यांनी समृद्ध जीवन चिटफंड कंपनी 2012 सालीच बंद केल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. इतरांची बाजू पुढे आलेली नाही.