केदारनाथमध्ये अडकले 15 हजार भाविक

0
6

वृत्तसंस्था
नवी दिल्ली,दि.२७- दोन दिवसांपासून सक्रीय झालेल्या मान्सूनमुळे उत्तराखंडमधील केदारनाथ यंदा पुन्हा जलप्रलयाची स्थिती निर्माण झाली आहे. बुधवारपासून उत्तराखंडमध्ये मुसळधार पाऊस सुरु आहे. गंगेच्या उपनद्या कोपल्या आहेत. त्याचप्रमाणे पुढील 72 तासांत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. केदारानाथमध्ये सुमार 15 हजार यात्रेकरू अडकल्याची माहिती मिळाली आहे. नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्सच्या (एनडीआरएफ) जवानांनी नऊ हजार यात्रेकरुंना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे.

राज्यातील पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर सरकारने केदारनाथ यात्रा दोन दिवसांसाठी बंद करण्यात आली आहे.एनडीआरएफच्या पथकाने 14 हेलिकॉप्टरच्या मदतीने शुक्रवारी 900 यात्रेकरूंना सुरक्षित ठिकाणी हलवले. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह केदारनाथ येथील परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. उत्तराखंडचे मुख्यमंत्र्यांकडून क्षणाक्षणाला माहिती जाणून घेत आहेत.
उत्तराखंडचे मुख्यमंत्री हरीश रावत यांनी सांगितले की, मुसळधार पावसामुळे राज्यात नैसर्गिक आपत्ती निर्माण झाली आहे. यात्रेकरुन हिम्मत सोडू नये, प्रशासनातर्फे यात्रेकरूंना मदत केली जाणार आहे. दुसरीकडे, कैलास मानसरोवर यात्रेचा चौथा जत्था धारचूला बेस कॅम्पमध्ये रोखण्यात आला आहे. मुसळधार पावसामुळे हेमकुंड साहिब आणि बद्रीनाथ भागातील 12 पेक्षाजास्त रस्ते आणि अनेक पूल वाहून गेले आहेत.
सोनप्रयाग जवळील पूल आणि रस्ता पुरात वाहून गेल्याने भाविकांना शुक्रवारी पुढे जाता आले नाही. त्याचप्रमाणे रुद्रप्रयाग जवळील एका पुलाची दुरुस्ती केली जात आहे. केबल कारच्या मदतीने अनेक यात्रेकरूंना सुरक्षित ठिकाणी पोहोचवले जात आहे.