१८ लाख रोजगार निर्माण होणार – नरेंद्र मोदी

0
10

वृत्तसंस्था
नवी दिल्ली, दि. १ – गरीबी आणि श्रीमंतांमधली दरी कमी करण्यासाठी सर्वोत्तम माध्यम हे डिजिटल इंडिया असेल असं सांगत येत्या काळात १८ लाख रोजगार डिजियल क्षेत्रात निर्माण होणार असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितले. राजधानीमध्ये डिजिटल इंडिया वीकचे उद्घाटन मोदींनी केले आणि आयटी क्षेत्राचे महत्त्व अधोरेखीत करतानाच भारत संपू्र्ण शक्तीने या क्षेत्रात आघाडी मिळवेल असे ठामपणे सांगितले.
रिलायन्स उद्योग समुहाचे अध्यक्ष मुकेश अंबानींनी डिजीटल इंडिया मोहिमेत अडीच लाख कोटी रुपयांची गुंतवणुकीची घोषणा केली आहे. तसेच जियोद्वारा देशात करण्यात आलेली गुंतवणूक आणि प्रोजेक्ट्सची माहितीही अंबानी यांनी दिली. दिल्लीतील इंदिरा गांधी स्टेडियमवर हा कार्यक्रम झाला.
डिजिटल इंडियाच्या माध्यमातून भविष्यात देशात 18 लाख रोजगार निर्माण होणार आहेत. यामुळे गरीब आणि श्रीमंत अशी दरी कमी करण्यास प्रोत्साहन मिळणार असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितले. टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून आपल्याला देशातील भ्रष्टाचारा‍विरोधात लढा द्यायचा आहे. तसेच देशातील तरुणाईचे डिजिटल इंडियाला मोठे योगदान लाभणार आहे.
देशाला ‘मेक इन इंडिया’सोबतच ‘डिझाईन इन इंडिया’चीही गरज वाहे. आयातीमध्ये दुसरा सगळ्यात मोठा वाटा इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनांचा आहे. देशातही इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनांची निर्मिती होते. या उत्पादनाला जागतिक बाजारपेठ मिळवून देणे, हेच डिजिटल इंडियाचे मुख्य ध्येय असल्याचे मोदींनी सांगितले.
डिजिटल लॉकर सर्व्हिसच्या माध्यमातून सगळी सर्टिफिकेट्स, महत्त्वाचे दस्ताऐवज सु‍रक्षित ठेवता येणार आहेत. तसेच सरकारी तसेच निमसरकारी कामे देखील भविष्यात पेपरलेस होणार आहेत.
सध्या देशात 25 ते 30 कोटी लोक इंटरनेट वापरतात पण अजून त्यापेक्षा जास्त लोकांना अद्याप इंटरनेट वापरणे परवडत नाही, ही वस्तुस्थिती असून ती आपल्याला आधी बदलायची आहे. आज लहान मुलगा पण आता स्मार्टफोनशी खेळतो. कारत त्याला त्यात त्याचे भविष्य दिसत आहे. त्याला त्याचे महत्त्व कळाले आहे. डिजिटल इंडियाच्या माध्यमातून किमान साडे चार लाख कोटी रुपयांची गुंतवणूक होणार असून 18 लाखांपेक्षा जास्त रोजगार निर्माण होणार असल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.