23.1 C
Gondiā
Wednesday, July 22, 2026
Home राष्ट्रीय देश सीआरपीएफ इमारतीला आग, जवान ठार

सीआरपीएफ इमारतीला आग, जवान ठार

0
16

राजधानी दिल्लीतील आर.के.पूरम भागातील केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या इमारतीमध्ये शनिवारी पहाटेच्या सुमारास भीषण आग भडकली होती.

नवी दिल्ली – राजधानी दिल्लीतील आर.के.पूरम भागातील केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या इमारतीमध्ये शनिवारी पहाटेच्या सुमारास भीषण आग भडकली होती.
या आगीमध्ये होरपळून एका जवानाचा मृत्यू झाला तसेच काही वस्तूंसह महत्वाची कागदपत्रे आगीत जळून खाक झाली. सीआरपीएफ इमारतीच्या चौथ्या मजल्यावरील इलेक्ट्रॉनिक डाटा प्रोसेसिंग सेंटरमध्ये पहाटे तीनच्या सुमारास ही आग लागली होती.
अग्निशमन दलाच्या सात गाडयांनी मिळून ही आग विझवली. सीआरपीएफचा एक जवान इमारतीत झोपला होता त्याचा आगीत होरपळून मृत्यू झाला. संपूर्ण चौथा मजला आगीत जळून खाक झाला.