25.1 C
Gondiā
Saturday, August 8, 2026
Home राजकीय मनसे सरचिटणीस गडकरी उद्या गोंदियात

मनसे सरचिटणीस गडकरी उद्या गोंदियात

0
29

गोंदिया,दि.21- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश सरचिटणीस हेमंत गडकरी उद्या शनिवारला गोंदिया जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. येत्या दोन महिन्यात होणाऱ्या नगरपंचायत निवडणुका तसेच संघटन बांधणीवर ते पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यासोबत चर्चा करुन करणार आहेत.यावेळी रक्तदान शिबिर तसेच कार्यकर्तेाचा मनसे प्रवेश कार्यक्रम केसर प्लाझा, बसस्थानकाजवळ गोंदिया येथे आयोजित करण्यात आला आहे.या बैठकिला जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते जिल्हा उपाध्यक्ष, तालुकाध्यक्ष, उपतालुकाअध्यक्ष, शहरअध्यक्ष, उपशहरअध्यक्ष, वार्ड अध्यक्षांनी उपस्थित राहावे असे आवाहन मनसे जिल्हाध्यक्ष मनीष चौरागडे व शहर अध्यक्ष सुरेश ठाकरे यांनी केले आहे.

blank