लालू जे निवडणूकच लढवू शकत नाही : मोदी

0
7

पाटणा -दि.९- पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी निवडणूक प्रचारासाठी सासारामला पोहोचले. त्यांनी काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी आणि राजद प्रमुख लालू प्रसाद यांच्यावर हल्ला चढवला. राहुलबाबत बोलताना मोदी म्हणाले की, एका नेत्याने काँग्रेसला 40 वर आणून बसवले आहे.
मोदी म्हणाले, एक नेता तर असे आहेत, ते जेव्हापासून काँग्रेसचे नेते बनले त्यांनी 440 जागा असलेला पक्ष 40 वर आणून ठेवला आहे. लालूंबाबत मोदी म्हणाले, लालू निवडणूक का लढवू शकत नाहीत, हे जरा त्यांना विचारा. त्यांनी असे काय केले की भारतीय न्यायालयाने त्यांना बिहारच्या राजकारणातून बाहेर काढले. त्यांनी असे केले तरी काय? अशा शब्दांत मोदींनी हल्ला चढवला. बिहारच्या मीडियाने त्यांना हे विचारण्याची हिम्मत तरी करून दाखवावी. निवडणूक लढवण्याचा हक्क त्यांच्याकडून कोणी हिसकावला. पण त्यांना रिमोटद्वारे बिहार चालवायचे आहे. ते म्हणतात की तेच बिग बॉस आहेत.
मोदी पुढे म्हणाले, ही निवडणूक केवळ सरकार निवडण्यासाठी नाही, असे मला वाटते. तर ही निवडणूक बिहारचे वाटोळे करणाऱ्या यापूर्वीच्या सरकारांना शिक्षा देण्यासाठीही आहे. मतदारांनी त्यांना शिक्षा देण्याचा संकल्प केला आहे. 16 तारखेला तुम्हीच स्वतः न्यायालयाच्या भूमिकेत असाल. बटन दाबा आणि गुन्हेगारांना शिक्षा देण्याचा निर्णय तुमच्याच हाती असेल.

आघाडीवरूनही मोदींनी जोरदार टीका केली. ते म्हणाले, एकिकडे एनडीए आहे, जे केवळ तुमच्यासाठीच आहे. तर दुसरीकडे तीन पक्षांची आघाडी आहे जी केवळ स्वार्थापोटी झाली आहे. हे तिघेही कोण जे कधी ना कधी आपसांतच भांडत होते. एकमेकांचे पाय ओढणे, गळे कापणे असे यांचा काम सुरू असते. पण मग ते अचानक एकत्र कसे आले? बिहारच्या मुद्यावर तर ते कधीही एकत्र आले नाहीत. हे केवळ सत्तेसाठी एकत्र आले आहेत. पण या तीन पक्षांपैकी कोणी मत मागायला आले तर त्याला 60 वर्षांत काय केले हे नक्की विचारा असे मोदी म्हणाले.