वन्यप्रेमी सावन बहेकार,मुकूंद धुर्वे व सहा.उपवनसंरक्षक खुणे यांचा सत्कार

0
15

गोंदिया,दि.9-लोक सहभागातुन वन्यजीव संवर्धन व संरक्षनात उत्क्रुष्ठ कार्य केल्याबद्दल संम्मानित गोंदिया जिल्ह्याचे मानज जिवरक्षक सावन बहेकार यांचा सत्कार नागपूर येथे पार पडलेल्या एका कार्यक्रमात करण्यात आला. बहेकार हे गेल्या अनेक वर्षापासून वन्यजीव रक्षक कार्यक्रमात सहभागी आहेत.त्यांना विशेषता सारस , blackbuck (कालविट) , वाघ व हालचालिवर अभ्यास, लांडगा (Indian wolves) यांचे संवर्धन व संरक्षनाचे कार्य।,शिकांरी वर नियंत्रण करने, नागझिरा नवेगाव व्याघ्र प्रकल्पा सभोवतालि जनजाग्रुति करने आदी कार्यात उत्कृष्ठ कार्य केल्याबद्दल त्यांना शासनाच्या वतीने सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमाला नागपूर उच्च न्यायालयाचे नागपूर खंडपिठाचे न्यायाधिश भुषण गवई,पीसीसीएफ ए.के.निगम आणि वनविभागाचे प्रमुख सर्जन भगत,वन्यजीव विभागाचे प्रमुख मेयोपीकीन अहेर,एपीसीसीएफ रामबाबू,टि.एस.के.रेड्डी,सीसीएफ नागपूर एम.एस.रेड्डी आदी या कार्यक्रमाला उपस्थित होते.याच कार्यक्रमात गोंदियाचे वन्यजीव प्रेमी मुकुंद धुर्वे आणि न्यु नागझिरा व्याघ्र प्रमुक अशोक खुणे यांचाही सत्कार करण्यात आला.या सर्वांचे गोंदिया भंडारा जिल्ह्यातील त्यांचे स्नेहीमित्रांच्यावतीने अभिनंदन करण्यात येत आहे.